नवी : दिल्लीत एकाच दिवशी सलग दुसऱ्यांदा भूकंपानं हादरलीय. या भूकंपाची तीव्रता २.७ रिश्टर स्केल एवढी मोजण्यात आलीय. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी १ वाजून २६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीमध्येच होता. परंतु, या झटक्यामुळे कोणत्याही प्रकारचं नुकसान झाल्याची माहिती नाही. परंतु, करोनाचा फैलाव सुरू असतानाच भूकंपाच्या दुसऱ्या धक्क्यानं नागरिक मात्र धास्तावलेत.
यापूर्वी रविवारी दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के बसले होते. सायंकाळी ५.४५ वाजता ३.५ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. हा झटका एवढा तीव्र होता की नागरिकांनी घाबरून आपल्या घराच्या बाहेर धाव घेतली.
रविवार आणि सोमवारच्या भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्ली हाच राहिला. तज्ज्ञांच्या म्हणण्यानसार भूकंपाचं केंद्र जमिनीखाली १५-२० किलोमीटर होतं. महत्त्वाचं म्हणजे, भूकंपासाठी दिल्ली नेहमीच संवेदशनशील भाग समजला जातो.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times