केरळमध्ये मुसळधार पावसाची हजेरी
नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे आगमन होण्याच्या अपेक्षेच्या काही दिवस आधीच केरळमध्ये पावसाचा जोर कायम आहे. सोमवारी पाच जिल्ह्यांमध्ये अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याचे संकेत देऊन हवामान खात्याने येथे रेड अॅलर्ट जारी केला आहे. एर्नाकुलम, इडुक्की, त्रिचूर, मलप्पुरम, कोझिकोडे जिल्ह्यांना रविवारसाठी तर एर्नाकुलम, इडुक्की, त्रिचूर, कोझिकोडे, कन्नूर या जिल्ह्यांना सोमवारसाठी हा इशारा देण्यात आला. आणीबाणीच्या कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे महसूलमंत्री के. राजन यांनी पत्रकारांना सांगितले.
देशातील कोणत्या राज्यांना पावसाचा तडाखा?
अनेक राज्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली असून केरळसह मेघालय, आसाम आणि पश्चिम बंगालमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे. दुसरीकडे, उत्तर भारतात मात्र उष्णतेची लाट कायम असल्याचं चित्र आहे.
बहावा वृक्ष बहरल्यानं शेतकऱ्यांना लागले मानसूनचे वेध