मुंबई: शिवसेनेचे दिवंगत लोकनेते आनंद दिघे यांच्यावर यांच्या आयुष्यावर आधारित असणारा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाची सध्या प्रचंड चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दक्षिण मुंबईतील आयनॉक्स मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहिला. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या एका कृतीची प्रचंड चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे या चित्रपटाचा शेवट न पाहाताच चित्रपटगृहातून बाहेर पडले. चित्रपटाच्या शेवटच्या १० मिनिटांत आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या जीपला झालेल्या अपघाताचा प्रसंग दाखवण्यात आला आहे. मात्र, हा प्रसंग मी पाहू शकलो नसतो. त्यामुळे मी चित्रपट संपण्यापूर्वीच चित्रपटगृहातून बाहेर पडल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मी आत्ता शेवटचा प्रसंग पाहू शकलेलो नाही. कारण आनंद दिघे गेले तेव्हा आमच्या सगळ्यांवर आघात झाला होता. आनंद दिघे गेल्यानंतर व्यथित झालेले बाळासाहेब ठाकरे मी पाहिले आहेत. आपल्या शिवसैनिकांवर प्रेम करणारे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे ही दोन्ही अजब रसायनं होती. त्याचं वर्णन नाही करता येणार, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
Anand Dighe Movie: दिघेसाहेबांना पाहून एकनाथ शिंदे भावूक; स्टेजवरच प्रसाद ओकच्या पाया पडले!

शेवटच्या सीनमध्ये नेमकं काय?

‘धर्मवीर’च्या शेवटच्या सीनमध्ये आनंद दिघे यांच्या जीपला झालेल्या अपघाताचा प्रसंग दाखवण्यात आला आहे. त्यावेळी राज ठाकरे आणि नारायण राणे हे आनंद दिघे यांची विचारपूस करण्यासाठी सिंघानिया रुग्णालयात गेले होते. हे सर्व प्रसंग शिवसैनिकांसाठी अंगावर काटा आणणारे आहेत. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी हा प्रसंग बघण्याचे टाळले. मिलिंद नार्वेकर यांच्या घरगुती गणपतीचे दर्शन घेऊन आनंद दिघे ठाण्यात परततात. चित्रपटातील हा प्रसंग संपताच उद्धव ठाकरे हे थिएटरमधून बाहेर पडले.

पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ‘धर्मवीर’ची घसघशीत कमाई

धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे हा चित्रपट. १३ मे रोजी हा चित्रपट मुंबई ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी या चित्रपटाचे अनेक शो हाऊसफुल्ल होते. ठाणे, कल्याण, बदलापूर, डोंबिवली, पुणे आणि मुंबईतही विविध ठिकाणी हाऊसफुल्ल गर्दी जमवण्यात चित्रपट यशस्वी ठरला आहे.पहिल्या दिवशीच या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १.७५ ते १.९० कोटी रुपयांची कमाई केल्याचे समजते. मात्र, अद्याप अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here