रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली हर्णै समुद्र किनाऱ्यावर गाडी पार्क करण्याच्या वादावरून पुण्यातील दोन तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या हल्ल्यातून दोन्ही तरुण थोडक्यात बचावले. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी संशयित हॉटेल सुरलीच्या भारत मुळ्ये व अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सगळा धक्कादायक प्रकार रविवारी सायंकाळच्या सुमारास घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णै समुद्र किनाऱ्याच्या रस्त्यावर ही घटना रविवारी सायंकाळी घडली. शुभम परदेशी (वय २९), सूरज काळे (वय २५) अशी हल्ला झालेल्या जखमी तरुणांची नाव आहे. हे दोन्ही तरुण पिंपरी चिंचवड येथील राहणारे आहे. महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता; जाणून घ्या संपूर्ण यादी… पिंपरी चिंचवड येथील ऐकूण पाच पर्यटक हर्णै समुद्र किनाऱ्यावरील समुद्र संकेत या हॉटेलमध्ये थांबले होते. मात्र, आज ते पुण्याकडे जायला निघाले होते. त्याचवेळी सुराली गार्डनजवळ एक ईनोव्हा गाडी रस्त्यावर लावण्यात आल्याने गाडी बाजूला कर, असे सांगितले. आपल्याला गाडीला बाजूला कर असे सांगितल्याचा राग मनात धरून पाठलाग करत टोळक्याने कोयत्याने हल्ला चढवला. शुभम परदेशी, सूरज काळे या हल्ल्यात जखमी झाले आहेत. त्यांच्या हातावर कोयत्याने वार करण्यात आला. तसंच गाडीची काचही फोडण्यात आली. या घटनेनंतर दोघांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.
दरम्यान, या सगळ्या धक्कादायक प्रकारामुळे दापोली तालुक्यातील सुसंस्कृत पर्यटनाला गालबोट लागले आहे. पोलिसांनी याप्रकरणी या संशयित हल्लेखोरांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.