उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला आता देवेंद्र यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अमृता फडणवीस यांनी सोमवारी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, वज़नदार ने हल्के को,बस हल्के से ही वज़न से, कल ‘हल्का’ कर दिया … अमृता फडणवीस यांच्या या ट्विटनंतर शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा वाकयुद्ध रंगण्याची शक्यता आहे.
देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
आज माझं वजन १०२ किलो आहे, बाबरी पाडायला गेलो होतो त्यावेळी माझं वजन १२८ किलो होतं, लाजायचं काय त्यात? मुख्यमंत्र्यांना सामान्य माणसाची भाषा कळत नाही, त्यांना एफएसआयच्या भाषेत उत्तर द्यावं लागतं. सामान्य माणसाचा एफएसआय १ असेल तर आज माझा २ आहे आणि बाबरी पाडताना तो २.५ होता, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.
बाबरी संघर्षात शेवटपर्यंत आम्ही शिवसैनिकांची वाट पाहिली पण…
या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी पडली तेव्हा त्याठिकाणी शिवसैनिक नसल्याचा पुनरुच्चार केला.कोठारी बंधूंनी बाबरीवर तेव्हा भगवा फडकवला. बाबरीच्या संघर्षात तेव्हा मी अनेक दिवस तुरूंगात होतो. बदायूच्या तुरुंगात अनेक दिवस मी काढले. आम्ही अयोध्येत गेलो. शेवटपर्यंत शिवसैनिकांची वाट पाहत राहिलो. पण हे शेवटपर्यंत आले नाहीत. बाबरी आम्हीच पाडली, असेही फडणवीस म्हणाले.