मुंबई : अभिनेत्री कियारा आडवाणी तिच्या आगामी ‘भूल भुलैय्या २’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. सिनेमाचं प्रमोशन करताना तिनं दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सुशांतसिंह राजपूत याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. कियारानं सुशांतबरोबर ‘एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी‘ या क्रिकेटपटू एम.एस. धोनी याच्यावरील बायोपिकमध्ये काम केलं होतं. सिनेमातली कियारा आणि सुशांतची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. सिनेमात काम करत असताना दोघांमध्ये खूप छान मैत्री झाली होती. यातूनच कियाराला सुशांतबद्दलच्या अनेक गोष्टी कळल्या त्यातून तो व्यक्ती म्हणून आणि एक अभिनेता म्हणून कसा आहे, हे कळलं. त्याच आठवणींना कियारानं मुलाखतीमधून उजाळा दिला आहे.

म्हणून इच्छा असूनही पंकज त्रिपाठी कधीच घेऊ शकणार नाही लग्झरी कार आणि घर

काय म्हणाली कियारा

कियारानं ‘द रणवीर शो’ या पॉडकास्टमध्ये सांगितलं की, ‘एमएस धोनी सिनेमाचं औरंगाबदला चित्रीकरण सुरू होतं. त्यावेळी त्याच्याशी बोलण्याची संधी मला मिळाली. रात्री ८ वाजता सिनेमाचं चित्रीकरण संपलं. पहाटे ४ वाजताचं आमचं विमान होतं. त्यामुळे झोप न काढता शहर फिरण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यावेळी सुशांतशी खूप गप्पा मारता आल्या. यावेळी सुशांतनं त्याचा आतापर्यंतचा रंजक प्रवासाविषयी सांगितलं. त्याच्या या प्रवासात प्रिती झिंटासाठी त्यानं एका ग्रुपमध्ये डान्स केला होता, इंजिनिअरींगच शिक्षण घेताना तो कशी मोठ्ठी मोठ्ठी पुस्तकं वाचायचा हे त्यानं सांगितलं होतं.’

सुशांत- कियारा

तो खूप अभ्यासू होता

कियारानं या मुलाखतीमध्ये सांगितलं की सुशांत खूप कुशाग्र बुद्धीचा होता. कियारानं पुढं सांगितलं की,’या सिनेमाचं चित्रीकरण करत असताना सुशांतकडे एक छोटी डायरी असायची. त्यात धोनीबद्दलची सगळी माहिती लिहिलेली होती. इतकंच नाही तर त्यानं धोनीला जे प्रश्न विचारले होते, त्याची उत्तर त्यानं या डायरीत लिहून ठेवली होती. सुशांतनं धोनीच्या व्यक्तीगत आणि प्रोफेशनल आयुष्याचा खूप अभ्यास करून त्याच्या नोट्स काढल्या होत्या.’ कियारानं पुढं सांगितलं की, ‘त्याच्याशी बोलताना मी म्हणाले की, तुझं आयुष्य इतकं रोमांचकारी आहे की त्यावर बायोपिक काढायला हवा. त्यावर तो फक्त हसला होता.’

सुशांत- कियारा

केवळ दोन तासच झोपायचा

याच मुलाखतीमध्ये कियारानं सांगितलं की, चित्रीकरणावेळी सुशांत रात्रीचा फक्त दोनच तास झोपायचा आणि दुसऱ्या दिवशी सेटवर जेव्हा तो यायचा तेव्हा ताजातवाना असायचा. त्याचं सगळ्यांना खूप आश्चर्य वाटायचं. ‘धोनी द अनटोल्ड स्टोरी’ हा सिनेमा २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा खूपच लोकप्रियही झाला होता. या सिनेमासाठी सुशांतला सर्वोत्तम अभिनेता म्हणून गौरवण्यात आलं होतं.

लता मंगेशकर यांना विष देऊन मारण्याचा केला होता प्रयत्न, ‘नाम रह जाएगा’मध्ये उलगडणार सत्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here