बुलडाणा : राजकीय नेते, पक्ष आणि संघटनांच्या भूमिकेमुळे राज्यात सध्या हिंदू-मुस्लिम असा वाद सुरू आहे. मात्र, या निमित्ताने आजही क्रांतिवीर या हिंदी चित्रपटातील नाना पाटेकर यांचा डायलॉग आठवतो. “ये मुसलमान का खून, ये हिंदू का खून, बता इस में कोनसा हिंदू का और कोनसा मुसलमान का? बनानेवाले ने इसमे फरक नही किया तो तू कोण होता है इसमे फरक करने वाला” आणि याचेच जिवंत उदाहरण बुलडाण्यात पाहायला मिळाले.

बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी भरती असलेल्या एका महिलेला रक्ताची नितांत गरज भासली आणि यासाठी एक मुस्लिम भगिनी समोर येऊन तिने रक्तदान करत सामाजिक एकतेचे दर्शन घडवले आहे. रामराव बोर्डे हे गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईमधील भांडूप येथे मासे विक्रीचा व्यवसाय करतात. मात्र, त्या गेल्या काही महिन्यांपासून बुलडाणा शहरात राहण्यासाठी आल्या. त्यांची मुलगी सविता इंगळे हिला गर्भ पिशवीचा आजार असल्याने तिला शस्त्रक्रियेसाठी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. यावेळी त्यांना ओ-निगेटिव्ह या रक्तगटाची नितांत गरज भासली. त्यामुळे रामराव बोर्डे यांनी रक्तासाठी शोधाशोध सुरू केली.

पुण्यातील पर्यटकांवर दापोलीत हल्ला; गाडीचा पाठलाग करत कोयत्याने वार
ही माहिती मिर्झा नगर इथे राहणारे शेख फारुख शेख हारून यांना मिळाली. त्यांचाही ब्लड ग्रुप ओ-निगेटिव्ह होता. पण त्यांनी गेल्या आठवड्यातच रक्तदान केले होते. त्यामुळे रुग्णाची परिस्थिती लक्षात घेता त्यांनी आपली बहीण राहत अंजुम शेख हारून यांना रक्तदान करण्याची विनंती केली. राहत अंजुम यांनीदेखील क्षणाचाही विलंब न करता रक्तदानासाठी होकार दिला. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या मुस्लीम भगिनीची रक्तदानाची ही पहिलीच वेळ होती.

या मुस्लिम भगिनीने आपल्या दुसर्‍या समाजाच्या भगिनीला रक्त देऊन तिचे प्राण वाचवले आहेत. आजही राज्यासह देशामध्ये धार्मिक राजकारण सुरू आहे. ज्या राजकीय नेत्यांना आपण विश्वासाने निवडून दिलं. ते सध्या हिंदू-मुस्लिम वाद पेटवण्यात दंग आहे. पण बुलढाण्यातील ही घटना मात्र सगळ्यांचेच डोळे उघडवणारी आहे.

विहिरीत शिवलिंग सापडलं?; ज्ञानव्यापी मशिदीच्या सर्व्हेक्षणादरम्यान आत्तापर्यंतचा मोठा दावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here