सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये बाबरी मशीद कोणी पाडली, यावरून श्रेयवादाचे राजकारण रंगले आहे. या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला लक्ष्य केले होते. त्यांनी म्हटले होते की, बाबरी पडली तेव्हा मी त्याठिकाणी होतो. तेव्हा अयोध्येत एकही शिवसैनिक नव्हता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला खोटं सांगून त्यांची दिशाभूल करू नये, असे दानवे यांनी म्हटले होते. मात्र, आता अब्दुल सत्तार यांच्या दाव्यामुळे दानवेच अडचणीत आले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम मुंबईतील भाजपच्या बुस्टर सभेत बाबरी मशिदीसंदर्भात विधान केले होते. बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा अयोध्येत एकही शिवसैनिक नव्हता, असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या दाव्यानंतर शिवसेनेचे नेते आक्रमक झाले होते. बाबरी मशीद पाडण्यात शिवसैनिकच आघाडीवर होते, असा प्रतिदावा सेनेकडून करण्यात आला होता. मात्र, फडणवीसांनी रविवारी मुंबईत झालेल्या सभेत शिवसेनेचा दावा पुन्हा एकदा खोडून काढला. बाबरी पडली तेव्हा त्याठिकाणी शिवसैनिक नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.कोठारी बंधूंनी बाबरीवर तेव्हा भगवा फडकवला. बाबरीच्या संघर्षात तेव्हा मी अनेक दिवस तुरूंगात होतो. बदायूच्या तुरुंगात अनेक दिवस मी काढले. आम्ही अयोध्येत गेलो. शेवटपर्यंत शिवसैनिकांची वाट पाहत राहिलो. पण हे शेवटपर्यंत आले नाहीत. बाबरी आम्हीच पाडली, असेही फडणवीस म्हणाले.
तुमच्या वजनानेच बाबरी खाली आली असती; वय किती, बोलता किती’