मुंबई: ‘धर्मवीर मु. पो. ठाणे’ हा चित्रपट १३ मे रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला. ठाणेच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात अनोख्या राजकीय शैलीमुळं ओळख निर्माण झालेल्या दिवंगत शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित या जीवनपटाची सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. आनंद दिघे यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांना त्यांच्या आक्रमक स्वभाव, माणुसकी व राजकारणापलीकडील भूमिकेची जाणीव आहे. दिघेंच्या आयुष्यातील महत्त्वाची पानं या चित्रपटातू प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहेत.
Dharmveer Movie: उद्धव ठाकरे ‘धर्मवीर’ चित्रपटाचा शेवट न पाहाताच थिएटरमधून बाहेर पडले
सध्या आनंद दिघे यांच्या आयु्ष्यातील प्रचंग आणि चित्रपटातील सीन असे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. असाच आनंद दिघे आणि राज ठाकरे यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. हाच प्रसंच चित्रपटातही आहे. चित्रपटातील दिघे आणि राज ठाकरे यांच्या या भेटीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

या व्हायरल व्हिडिओ अधिक चर्चेत येण्याचं कारण म्हणजे या व्हिडिओतील दिघे आणि राज यांच्यातील संभाषण. दिघेंच्या आयुष्यातील हे शेवटचे काही क्षण होते.अपघातानंतर आनंद दिघे हॉस्पिटलमध्ये असताना राज यांनी त्यांची भेट घेतली होती. त्याचाच हा प्रसंग आहे.
Dharmaveer Trailer- ‘डोक्यावर टोपी घालून फिरणारा नाही, डोक्यात जिहाद घेऊन जगणारा मुसलमान आपला शत्रू’

आनंद दिघे आणि राज यांच्यातील या हॉस्पिटलमध्ये भेटीतही हिंदुत्वावर चर्चा झाली होती. ‘धर्मवीर हिंदुत्वाचं काम अजूनही सर्वदूर पोहोचलं नाहीए, असं पडून राहून कसं चालेल’, असं तत्कालीन विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दिघेंना म्हणताना दिसत आहेत. यावर ‘हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर’ असं दिघे राज यांना म्हणतात. या प्रसंगावरून पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here