मुंबई : सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, आज अंदमानात मान्सून दाखल झाला आहे. हवामान खात्याकडून यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. आज सकाळपासून मान्सूनने अंदमानात हजेरी लावली असून अनेक भागांमध्ये ढग दाटून आले आहे. अंदमानात आज तर केरळमध्ये १ जूनला मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

अधिक माहितीनुसार, पुढील ५ दिवस अंदमान आणि केरळमधील नजिकच्या शहरांमध्ये मुसळधार पाऊस होईल. केरळसह दक्षिण भारतातील काही राज्यांना पावसाने झोडपून काढलेलं असताना महाराष्ट्रातीलही नऊ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच मोसमी पावसाची प्रगती वेगाने होत असल्याने हा पाऊस अंदमान आणि निकोबार बेटांवर धडकला आहे.

हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दक्षिणेकडील द्वीपकल्प आणि केतल्सच्या किनार्‍यावर, अरबी समुद्र आणि बेटांच्या क्षेत्रांवर ढगाळ वातावरण आहे. इतकंच नाहीतर मराठवाड्यातील विदर्भाच्या काही भागांतही ढगांचे वातावरण आहे. राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

या पार्श्वभूमीवर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता; जाणून घ्या संपूर्ण यादी…

देशातील कोणत्या राज्यांना पावसाचा तडाखा?

अनेक राज्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली असून केरळसह मेघालय, आसाम आणि पश्चिम बंगालमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे. दुसरीकडे, उत्तर भारतात मात्र उष्णतेची लाट कायम असल्याचं चित्र आहे.
पुण्यातील पर्यटकांवर दापोलीत हल्ला; गाडीचा पाठलाग करत कोयत्याने वार

महाराष्ट्रातील’ नऊ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; यलो अलर्ट जारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here