Raj Thackeray rally | मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यासाठी मनसेकडून १० ते १२ रेल्वेगाड्यांची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबईसह ठाण्यातील सर्व विभाग अध्यक्षांची एक बैठक मुंबईत पार पडली होती. हा दौरा राज ठाकरे आणि मनसेच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यापूर्वी पुण्यात मनसेची सभा होईल.

हायलाइट्स:
- राज ठाकरे यांनी यापूर्वीच्या आंदोनलांवेळी उत्तर भारतीयांना त्रास दिला होता
- माफी मागितल्याशिवाय राज ठाकरे यांना अयोध्येत पाऊल ठेऊन देणार नाही
राज ठाकरे यांनी मुंबईतील गुढीपाडवा मेळाव्यात भविष्यात प्रखर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून वाटचाल करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यासाठी राज ठाकरे येत्या ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. हा दौरा राज ठाकरे आणि मनसेच्यादृष्टीने (MNS) अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, राज ठाकरे यांना अयोध्येत येऊ देण्यास भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी यापूर्वीच्या आंदोनलांवेळी उत्तर भारतीयांना त्रास दिला होता. त्यामुळे माफी मागितल्याशिवाय राज ठाकरे यांना अयोध्येत पाऊल ठेऊन देणार नाही, अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली होती.
तर दुसरीकडे मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून मनसेने पुकारलेल्या आंदोलनावरून महाविकास आघाडीकडून राज ठाकरे हे जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आता पुण्यातील सभेत कोणती नवी भूमिका मांडणार, हे पाहावे लागेल.
‘महाराष्ट्र पेटविण्याची भाषा करू नका, नाहीतर..’; रामदास आठवलेंचे राज ठाकरेंवर टीकास्त्र
याशिवाय, गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये धुसफूस सुरु असल्याचे दिसत आहे. मनसेच्या कोअर कमिटीमधील काही नेत्यांकडून माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांना सातत्याने डावलले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. वसंत मोरे यांनी या सगळ्याची तक्रार वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. त्यामुळे पुण्यातील सभेत राज ठाकरे हे वसंत मोरे आणि मनसेच्या इतर पदाधिकाऱ्यांना नक्की काय आदेश देणार, हे पाहावे लागेल.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : mns cheif raj thackeray will take sabha rally in pune by may end
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network