छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार मिळाल्यानंतर निखिलनं एक पोस्ट शेअर केली आहे.
काय आहे निखिलची पोस्ट?
‘संभाजी ब्रिगेड – मराठासेवासंघ यांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा राज्यस्तरीय ‘ छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार २०२२’ हा मला देण्यात आला. ह्या पूर्वी हा पुरस्कार खासदार अमोल कोल्हे, अंकुश चौधरी, नागराज मंजुळे, भरत जाधव ह्यांना मिळाला आहे.
छत्रपती संभाजी महाराज जयंती दिवशी पुरंदर किल्ल्यावर हा पुरस्कार खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार रोहित दादा पवार, राज्यमंत्री विश्वजीत पतंगराव कदम, युवराज शहाजीराजे छत्रपती, आमदार संजय जगताप व प्रवीण दादा गायकवाड ह्यांच्या हस्ते मिळाला हे माझं भाग्य समजतो. किल्ले पुरंदर येथे साजऱ्या झालेल्या स्वराज्यवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवात सहभागी होता आले याचा आनंद आहे’, असं निखिलनं त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
‘लागीरं झालं जी’ मालिकेत निखिलनं महत्त्वाची भूमिका साकारली होती. हाती तिरंगा घेऊन वीरमरण पत्करणाऱ्या विक्रमच्या व्यक्तिरेखेचं प्रेक्षकांनी कौतुक केलं. फौजी विक्रम उर्फ विक्या अर्थात, निखिल चव्हाण आता वेबसीरिज ,चित्रपटांमध्ये चमकतोय. गेल्या वर्षी त्याची कारभारी लयभारी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेत त्यानं राजकारणी नेता साकारला होता.