गुरे चोरणाऱ्या टोळीतील एकाचा मारहाणीत मृत्यू…
गुरांची चोरी करीत असल्याच्या संशयावरून माणगावात तीन अनोळखी व्यक्तींवर जमावाने हल्ला केला. या वेळी बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू झाला, तर दोघे पळून गेले. पोलिसांनी याप्रकरणी महेश सुतार, केतन कोदे, गणेश सुतार, सचिन अडूळकर (चौघे रा. विळे), सागर खानविलकर,(रा. भाले), संदीप कुरमे, शुभम धूपकर (दोन्ही रा. निजामपूर), संकेत सखाराम सुतार, रूपेश विलास सुतार, संतोष पडवळ (तिघे रा. म्हसेवाडी), नरेश जाधव (रा. फणसीडांग आदिवासीवाडी), सूरज बावधाने (रा. विळे, धनगरवाडी), करण श्रीपत म्हामुणकर (रा. पाटणूस) अशा १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
१३ जणांवर गन्हा दाखल…
घटनेची माहिती मिळताच माणगाव उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण पाटील, निरीक्षक राजेंद्र पाटील, सहाय्यक निरीक्षक आस्वर, उपनिरीक्षक कीर्तिकुमार गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी सात जणांना अटक केली असून, माणगाव न्यायालयाने १४ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर सहा आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.