भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली. शिवसेनेला मुंबई तोडण्याचा डाव आणि हिंदुत्व अपयश आल्यावर आठवतं, असा आरोप राणेंनी केला.

हायलाइट्स:
- नारायण राणेंच्या निशाण्यावर शिवसेना
- उद्धव ठाकरेंवर टीका
- उद्धव ठाकरेंचं भाषण टोटल बोगस असल्याचा आरोप
भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. शिवसेनेचे निवडून आलेले आमदार खासदार ही मोदीकृपा आहे. त्यांचे ८च्या पुढं खासदार जात नव्हते. आमदारही १५ च्या पुढे जात नव्हते. आता असलेले ५६ ते देखील पडतील, असं नारायण राणे म्हणाले. निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या काळात ५० हजार रुपये देऊ असे सांगायचे. मात्र, त्यातील ५ हजार रुपये तरी दिलेत का, असा सवाल राणे यांनी केला. मुंबईतील मराठी माणूस वसई विरारकडे गेला, असा आरोप राणेंनी केला. मुंबईत एका मातोश्रीच्या दोन मातोश्री झाल्याचं देखील राणे म्हणाले.
आम्ही सडेतोड बोलतो, खरं बोलतो, बोगस माहिती देत नाही, असं राणे म्हणाले. उद्धव ठाकरेंचं परवाचं भाषण बोगस होतं. पाकिस्तानशी लढाई झाली आणि यांना बघायला सांगितलं तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बोलतो म्हणतील, अशी टीका राणेंनी केली. उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करु नये. बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी यांचे संबंध होते. पण, उद्धव ठाकरेंनी काही बोलायचं ठेवलं नाही, असं राणे यांनी म्हटलं. बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे असूनही मला मुख्यमंत्री केलं. तुम्ही १० वर्ष मुख्यमंत्री राहिलात तरी माझ्या ८ महिन्यांच्या कामाची बरोबरी करु शकणार नाही. शिवसंपर्क अभियान नव्हतं तर शिव्या संपर्क अभियान आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : narayan rane slam uddhav thackeray over video conferencing and various issues
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network