अकोला : ‘ट्रॅक्टर आमचा, डिझेल तुमचे’ पालकमंत्री बच्चू कडू यांच्या अभिवन योजनेचा आज शुभारंभ झाला आहे. पालकमंत्री राज्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते आज अकोट तालुक्यातील वरुळ-जाउळकामधून या उपक्रमाला सुरवात झाली आहे. जिल्ह्यातील निराधार, विधवा आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महिलांना आधार मिळावा म्हणून पालकमंत्री बच्चू कडू यांच्या पुढाकाराने ही योजना राबविण्यात येत आहे.
Home Maharashtra tractor ours: ‘ट्रॅक्टर आमचा, डिझेल तुमचे’, बच्चू कडूंच्या योजनेचा शुभारंभ, १९१ महिलांना...