यवतमाळ : पेपरच्या टेन्शनमूळे २१ वर्षीय तरूणाने गळफास लावून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शहरातील धामणगाव मार्गावर असलेल्या गिरीजा नगरात रविवार १५ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. ओम पुरुषोत्तम श्रीपत्तीवार (२१) रा. दुर्गामाता वार्ड घाटंजी असे मृत तरूणाचे नाव असून तो यवतमाळ शहरातील वाधवानी फार्मसी कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिक्षण घेत होता.

रूममध्ये गळफास लावून केली आत्महत्या…

घाटंजी शहरातील दुर्गा माता वार्डात राहणारा ओम श्रीपत्तीवार हा यवतमाळ शहरातील वाधवानी फार्मसी कॉलेजमध्ये प्रथम वर्गात शिक्षण घेत होता. त्यामूळे तो कॉलेज परिसरातील गिरजा नगर येथे नरेश कळबे यांच्याकडे तिन मित्रांसह किरायाने रूम करून राहत होता. ओम याचा मित्र शूभम कांबळे व चंद्रशेखर वाघमोडे दोघेही दि. १२ मे रोजी सुट्या असल्यामुळे नांदेड या त्यांच्या गावी गेले होते, तर शशांक वैश्य हा देखील दि. १५ मे रोजी घाटंजीतील घरी गेला होता. त्यामूळे रूममध्ये ओम श्रीपत्तीवार हा एकटाच होता. अश्यात सायंकाळच्या सुमारास ओम याने रूममध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती त्या ठिकाणी किरायाने राहणाऱ्या शंकर काळे यांनी कळंबे यांना सांगितले.

मुंबई इंडियन्सच्या संघात मोठा बदल, सूर्यकुमारच्या जागी धडाकेबाज खेळाडूची दिमाखात एंट्री
घरमालकाने बघितल्यावर प्रकार आला समोर…

यावेळी घरमालक नरेश कळबे यांनी धाव घेत खिडकीतून बघीतले असता, ओम हा पंख्याला नॉयलॉन दोरीने गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती शहर पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहाणी केली. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आला. यावेळी पोलिसांना ओम याच्या रूममध्ये एक पत्र आढळून आले असून त्यात पेपर टेन्शन, असा उल्लेख करण्यात आला होता.

IPL 2022, PBKS vs DC Live Score : दिल्ली आणि पंजाबच्या सामन्याचे लाइव्ह अपडेट्स
काही दिवसापासून ओम याचे पेपर सुरू असून त्याच टेन्शनमध्ये त्याने आत्महत्या केल्याची माहिती परिसरातील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. यावेळी परिसरातील शेकडो नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी केली होती. या प्रकरणाचा पुढील तपास शहर ठाणेदार नंदकुमार पंत यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस करीत आहे.

Aadhaar Card: आता मराठीत बदलू शकता आधार कार्डवरील माहिती, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here