पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनकपूर कार्यक्रमात नेपाळशिवाय भगवान राम अपूर्ण असल्याचं म्हटलं होतं, असं सांगितलं. नेपाळ देखील भारतात राम मंदिराची उभारणी होत असल्यानं आनंदाचं वातावरण आहे. नेपाळ हा पर्वतीय देश आहे. या देशानं मंदिरांचं, प्राचीन संस्कृतीचं जनत केलेलं आहे. जगात निर्माण झालेल्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत आणि नेपाळ एकत्र येऊन मानवतेच्या हितासाठी काम करेल, असं नरेंद्र मोदी म्हणाले. बुद्ध बोध आहेत, शोध आणि संस्कार देखील आहेत, असं ते म्हणाले .
गौतम बुद्धांनी उपदेशाऐवजी ज्ञानाच्या अनुभूतीला प्राधान्य दिलं. जीवनात अनेक गोष्टी मिळवण्यापेक्षा त्याग महत्त्वाचा असल्याचं बुद्धांनी आपल्याला सांगितलं आहे. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बुद्धांचा जन्म झाला होता. याच दिवशी बोधगया येथे त्यांना बोध प्राप्ती झाली होती.
नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील वडनगर येथे त्यांचा जन्म झाल्याचं सांगितलं. वडनगर अनेक वर्षांपूर्वी बौद्ध शिक्षणाचं मोठं केंद्र असल्याचं सांगितलं. तिथं प्राचीन अवशेष सापडले असून त्याच्या संवर्धनाचं काम सुरु असल्याचं मोदी म्हणाले. भारतातील सारनाथ,बोधगया, कुशीनगर ते नेपाळमधील लुम्बिनी ही पवित्र ठिकाणं भारत नेपाळ यांचं वैभव असल्याचं म्हटलं आहे. आपल्याला वारसा संरक्षित आणि संवर्धित करण्याची गरज असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं मी नेपाळमधील जनता आणि जगभरातील बुद्ध अनुयायांना शुभेच्छा देतो, असं मोदी म्हणाले.
एकला चलो रे असं तरी मी पक्षासोबतच | वसंत मोरे