रत्नागिरी : रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे आणि काँग्रेसचे माजी खासदार व महाराष्ट्राचे माजी कायदामंत्री हुसैन भाई दलवाई (सिनियर) यांचे आज संध्याकाळी मुंबई हाॅस्पीटलमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचे वय १०० वर्षे होते. हुसैन भाई दलवाई यांनी १९६२ ते १९७८ असा दीर्घकाळ महाराष्ट्र विधानसभेत खेड मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. १९७७ ते १९७८ मध्ये एक वर्ष महाराष्ट्राचे कायदामंत्रीपद त्यांनी भूषविले. मे १९८४ मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली आणि राज्यसभा सदस्यत्वाचा साडेपाच वर्षाचा कार्यकाळ शिल्लक असतानाही तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी त्यांना डिसेंबर १९८४ मध्ये लोकसभा निवडणूक लढण्याचा आग्रह केला आणि त्या निवडणुकीत ते रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले.
Home Maharashtra death news: रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हुसैनभाई दलवाई यांचे निधन –...