एएनआय या वृत्त संस्थेच्या ट्विटनुसार हिंदू संघटनांनी सोमवारी कर्नाटकातील मांड्या शहरातील जामिया मशिदीत हनुमानाच्या मूर्तीची पूजा करण्याची परवानगी मागितील आहे. कार्यकर्त्यांनी मांड्याच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. जामिया मशीद पूर्वी मंदिर होत, असा दावा करण्यात आला आहे.
हनुमानाच्या मंदिराच्या जागेवर जामिया मशीद बनवण्यात आली आहे. जामिया मशीद असलेल्या ठिकाणी मंदिर असल्याचे पुरावे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. टीपू सुल्ताननं फारसचा राजा खलीफ याला पत्र लिहिलं होतं. पुरातत्व विभागाला यावर विचार करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. मशिदीच्या परिसरातील तलावात अंघोळ करण्याची मागणी केली आहे.
ज्ञानवापी मशिदीचं सर्वेक्षण पूर्ण
दुसरीकडे, उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. हिंदू पक्षाच्या लोकांनी मशिदीच्या परिसरात १२ फूट ८ इंच आकाराचं शिवलिंग मिळाल्याचा दावा केला आहे. न्यायालयानं ते सील करण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टानं यानंतर ज्या ठिकाणी शिवलिंग मिळालंय ती जागा सील करण्याचे आदेश दिले आहेत. त्या ठिकाणी कुणाला जाऊ न देण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. वाराणसी जिल्हा प्रशासनाला त्या ठिकाणाला संरक्षित करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. पोलीस, दंडाधिकारी आणि सीआरपीएफला सील करण्यात आलेल्या जागेचं संरक्षण करण्याच जबाबादरी देण्यात आली आहे. न्यायालयानं त्या जागेचं संरक्षण आणि इतर व्यवस्थेची जबाबदारी उत्तर प्रदेशचे डीजीपी आणि मुख्य सचिवांना दिली आहे.
भाजप कार्यकर्ता राष्ट्रवादीच्या महिलेला मारायला गेला, पण महिला पोलिसाने कानाखाली लगावली आणि विषयच संपवला