दिसपूर : आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून जनजीवन पूर्णपणे ठप्प झालं आहे. राज्यातील सर्वच सेवांना या पुराचा फटका बसला असून सात जिल्ह्यांमधील तब्बल ५७ हजार लोक बेघर झाल्याची माहिती आहे. तसंच भूस्खलनामुळे तीन लोकांनी आपला जीव गमावला आहे.

प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुरामुळे बाधित झालेल्या ४ हजार ३३० लोकांना सरकारकडून तयार करण्यात आलेल्या दिलासा केंद्रांमध्ये ठेवण्यात आलं आहे. तसंच इतरही नऊ जिल्ह्यांमध्ये सरकारकडून मदतकार्य सुरू आहे. पुरामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून शनिवारपासून जवळपास १८ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच १० पेक्षा अधिक रेल्वे गाड्यांबाबत अद्याप अनिश्चितता आहे.

नवनीत राणा फसल्या; हनुमानाबद्दल प्रश्न विचारताच झाली पंचाईत, VIDEO व्हायरल

रेल्वेत अडकलेल्या प्रवाशांसाठी रेस्क्यू ऑपरेशन

मुसळधार पावसामुळे बहुतांश भागातील रेल्वे रूळ पाण्याखाली गेले आहेत. लुमडिंग-बदरपूर परिसरात दोन दिवसांपासून अडकलेल्या दोन रेल्वे गाड्यांमधील जवळपास २ हजार ८०० प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्याचं काम हवाई दल आणि इतर यंत्रणांच्या मदतीने सोमवारी पूर्ण करण्यात आलं.

दरम्यान, आसाममध्ये सुरू असलेला पाऊस आणखी काही तास सुरू राहिला तर राज्यातील स्थिती आणखी बिघडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here