वृत्तसंस्था, चित्रकूट :

चोरी केल्यानंतर दु:स्वप्न पडू लागल्याने चोरट्यांनी येथील प्राचीन बालाजी मंदिरातून चोरलेल्या अष्टधातूच्या तब्बल १४ मूर्ती पुजाऱ्याला परत केल्या. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली.

तरौन्हा येथील या मंदिरातून कोट्यवधी रुपयांच्या धातूच्या १६ मूर्ती ९ मे रोजी रात्री चोरीला गेल्या होत्या. येथील महंत रामबलक यांनी याबाबत तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता, असे सदर कोतवाली कारवीचे स्टेशन हाऊस ऑफिसर राजीवकुमार सिंह यांनी सांगितले.

पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात राडा; भाजपच्या कार्यकर्त्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

यातील १४ मूर्ती महंतांच्या घराजवळ एका टोपलीत ठेवलेल्या आढळल्या. यासोबत एक पत्रही होते. चोरीनंतर रात्री भीतीदायक स्वप्ने पडत होती. त्यामुळे या मूर्ती परत करत आहोत, असे चोरट्यांनी यात लिहिले होते. सध्या या अष्टधातूच्या मूर्ती कोतवालीत जमा करण्यात आल्या असून, पुढील कार्यवाही सुरू आहे, असेही सिंह म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here