पुणे: पुणे महानगरपालिकेच्या एका मृत सफाई कर्मचाऱ्याचे कपडे घरी आणून ते स्वत:ला व्यवस्थित बसतील असे फिटिंग केले. त्यानंतर हे कपडे घालून गांजा आणला. मात्र पोलिसांना त्यांचा संशय आल्याने त्यांनी चौकशी केली आणि त्याचे बिंग फुटले. या तरुणासह स्वच्छता कर्मचारी बनून गेलेल्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे.

अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या दोन तरुणांनी गांजा आणण्यासाठी चक्क पालिकेच्या मृत सफाई कर्मचाऱ्यांचे कपडे वापरले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऋषी रविंद्र मोरे (वय २०) आणि सागर चंद्रकांत सुर्वे (२५, दोघे रा.पर्वती, पुणे) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरोधात सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार आर. बी. मुंडे यांनी तक्रार दिली आहे.

दरम्यान, गांजाच्या व्यसनापायी चक्क चक्क मृत सफाई कर्मचाऱ्यांचे कपडे वापरण्याचा हा प्रकार चक्रावून टाकणारा असून याबाबत पोलीस कसून तपास करत आहेत. हे कपडे या दोघांना कसे मिळाले, याचाही तपास करण्यात येत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here