औरंगाबाद : लग्नाच्या अवघ्या पाच महिन्यातच एका २५ वर्षीय तरुणाने व्हॉट्सअप्पवर ‘आय क्विट’ असं स्टेटस ठेऊन राहत्याघारी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजनगर मुकुंदवाडी भागात ही घटना घडली आहे. घटनस्थळी पोलिसांना मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये पसंतीची पत्नी न भेटल्याने आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख आहे. अजय समाधान साबळे वय-२५ (रा. राजनगर, मुकुंदवाडी) असं मृत तरुणाचं नाव आहे.

या प्रकरणी नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय हा प्लंबिंगचे काम करायचा. पाच महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. गेल्या काही दिवसांपासून अजय सोशल मीडियावर निराशाजनक स्टेटस ठेवत होता. त्याच्या मित्रांनी अनेकवेळा त्याला याबाबत विचारणा केली होती. मात्र, त्याने बोलणे टाळले असे त्याचे मित्र सांगतात. रविवारीदेखील त्याने असेच ‘आय क्विट’ असे लिहले आणि फाशी घेतलेल्या अवस्थेतील व्हिडिओ स्टेटसवर ठेवला.

तीन वाहनांच्या विचित्र अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, तब्बल ६ जण गंभीर जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, अजयने ओढणीच्या साहाय्याने छताला गळफास घेतला. ही बाब घरच्यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने त्यास फासावरून खाली उतरवत घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांना अजयच्या खोलीची पाहणी दरम्यान एक सुसाईड नोट आढळून आली. त्यामध्ये मनासारखी बायको मिळाली नाही, तिला साडी नेसता येत नाही, स्वयंपाक येत नाही. हॉटेलमध्ये जेवायला नेले तर जेवणानंतर जेवणाची थाळी दुसऱ्याकडे नेऊन ठेवते असा उल्लेख आहे. चिट्ठीतील हस्ताक्षर अजयचेच आहे का? याची तपासणी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारला भीषण अपघात; थोडक्यात बचावले!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here