मुंबई : नेहमीप्रमाणे याही वर्षी आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवायला कान्स फिल्म फेस्टिवलला निघाली आहे. मुंबई विमानतळावर फोटोग्राफर्सनी ऐश्वर्याला गाठलंच. पण तिच्याबरोबर आणि आराध्या होते. लक्ष वेधून घेतल होतं ते फक्त आराध्यानं. आराध्या छायाचित्रकारांना पोज देण्यात मग्न होती. मम्मी ऐश्वर्या कौतुकानं पहात होती.
सोशल मीडियावर ऐश्वर्या राय बच्चनचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ती अभिषेक आणि आराध्याबरोबर मुंबई विमानतळावर पोहोचली. ऐश्वर्यान काळ्या रंगाचा ड्रेस घातलाय. तर आराध्या पिंक पोशाखात आहे. यावेळी ऐश्वर्यानं मुलीचा हात पकडला नसून, तिच्या खांद्यावर ठेवून ती बरोबरीनं चालत आहे.