मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूपच सक्रीय असतात. फेसबुक असो, ट्विटर असो अथवा इन्स्टाग्राम सगळीकडे ते सक्रीय असतात आणि सातत्यानं नवीन नवीन गोष्टी पोस्ट करत असतात. अनेकदा अमिताभ जे पोस्ट करत असतात त्यावरून त्यांच्यावर टीका केली जाते. कारण ते काय लिहितात हे कुणालाच कळत नाही. आतादेखील अमिताभ यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टवरून युझर्सनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. हे ट्रोलिंग होत असताना काही ट्रोलर्सनी त्यांच्या मर्यादा सोडल्या. परंतु या सर्वांना अमिताभ यांनी अत्यंत संयत शब्दात उत्तर दिलं आहे. त्यांच्या या उत्तरामुळे युझर्सची मनं जिंकली आहेत.

Exclusive: उर्मिलासोबतच्या नात्याविषयी अखेर स्पष्टच बोलला आदिनाथ कोठारे

काय घडलं होतं नेमकं?

महानायक अमिताभ बच्चन यांनी १५ मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी लिहिलं होतं की, ‘FB ३२९२- प्रातःकाळाच्या शुभेच्छा!’ आता ही पोस्ट पाहिल्यावर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यावर सोशल मीडिया युझर्सनी मजेशीर कॉमेन्ट करायला सुरुवात केली. चंदन वर्मा नावाच्या एका युझरनं लिहिलं की, ‘ तुम्हाला असं वाटत नाही का, तुम्ही फार लवकर सुप्रभातच्या शुभेच्छा दिल्या आहेत…’त्यावर अमिताभ यांनी म्हटलं आहे की, ‘तुमच्या प्रतिक्रियासाठी आभार… परंतु उशीरापर्यंत काम करत होतो… चित्रीकरण आताच संपलंय… त्यामुळे सकाळी उठायला उशीर होतो… म्हणून आताच शुभेच्छा दिल्या…त्यासाठी जर तुम्हाला काही त्रास झाला असेल तर मला क्षमा करा…’

अमिताभ बच्चन

अमिताभ यांनी दिलं युझर्सना चोख उत्तर

यावर आकाश दीप गुप्तानं लिहिलं की, ‘ आज तुमचा हँगओव्हर उशीरा उतरला का… असं वाटतं की तुम्ही ‘देशी’ घेतली आहे असं वाटतंय… कारण रात्रीच्या ११.३० वाजता तुम्ही सुप्रभात म्हणालात…’ याबरोबर त्यानं हसण्याची स्माईली टाकली आहे. त्यावर अमिताभ बच्चन यांनी राग व्यक्त केला नाही. उलट मजेशीर अंदाजात त्यांनी लिहिलं की, ‘ मी स्वतःपीत नाही…उलट इतरांना मधुशाला पाजतो…’ अंकुश कुमार शर्मा या युझरनं लिहिलं की, ‘देव तुम्हाला सुबुद्धी देवो’ त्यावर अमिताभ यांनी लिहिलं की, ‘अंकुश कुमार शर्मा तुमची कृपा दृष्टी अशीच राहो…’

मुक्ता बर्वे का म्हणालेली, मनातलं व्हायोलीन वाजलं तर ठीक, नाही तर नाही

काही युझर्सनी सोडली मर्यादा

त्यानंतर एका युझरनं तर अमिताभ बच्चन यांना थेट म्हातारा असं संबोधलं आहे. हे त्यानं लिहिलं की, ‘अरे म्हाताऱ्या १२ वाजत आहेत आणि तुम्ही आत्ताच सुप्रभात का म्हणत आहात… ‘ इतकंच नाही तर या युझरनी त्यांना मानालायक असंही म्हटलं आहे. त्यावर बिग बी म्हणाले की, ‘ओह..बोला बोला…तुम्ही तर जे वास्तव आहे तेच सांगत आहात… मी याच देशात आहे आणि रात्रभर काम करत आहे. त्यामुळे उशीरा उठतो.’ यानंतर महानायकानं सांगितलं की, ‘रात्रभर काम करून सकाळी उशीरा उठतो.. लायकजी’

अमिताभ बच्चन यांचे आगामी सिनेमे

अमिताभ बच्चन यांच्या कामाबाबत सांगायचं तर काही दिवसांपूर्वी ते नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ सिनेमात आणि अजय देवगणच्या ‘रनवे ३४’ सिनेमात दिसले. याशिवाय ते ९ डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणाऱ्या रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्याबरोबर ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात दिसणार आहेत. तसेच दीपिका पादुकोणबरोबर ‘द इंटर्न’ सिनेमात आणि ‘गुडबाय’ सिनेमातही दिसणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here