दरम्यान, २५ जुले २०२१ रोजी अक्षय याने त्या तरुणीला फोन करून मित्राला नोट्स पाहिजे, ते घेण्यासाठी औरंगाबादला येत असल्याचे सांगितले. अक्षय हा त्याच्या मित्रासह औरंगाबादला आला. त्यानंतर अक्षय व त्या तरूणीची भेट झाली. त्यावेळी तुला घरी सोडतो असे सांगत त्या तरुणीला कारमध्ये बसवले. पण तिला घरी न सोडता अक्षय याने कार तिसगाव फाटा या निर्जन रस्त्याकडे वळविली. त्यावर तरुणीने आक्षेप घेतला. त्यावेळी कार थांबवून मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणत अक्षय तरुणीसोबत अंगलगट करू लागला.
या कृत्याला विरोध करत तरूणीने अक्षयला समाजविण्याचा प्रत्यन केला. मात्र, अक्षयने त्या तरुणीवर जबरवस्तीने आत्याचार केला. त्यावेळी अक्षयसोबतच्या मित्राने याचा मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट केला. तसेच याबद्दल कोणाला काही सांगितले तर व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी देत त्या तरूणीला घरी सोडले. घरच्यांच्या आणि समाजाच्या भितीने त्या तरूणीने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारवांर विविध ठिकाणी नेऊन अक्षयने त्या तरुणीवर वेळोवेळी आत्याचार केला.
भाजप कार्यकर्त्याने महिलेला धक्काबुक्की केली; राष्ट्रवादीनेही तिघांना असं अडकवलं
या तरुणीचा नेवास फाटा येथे विवाह होणार होता. मात्र, अक्षय यांने त्या तरुणीच्या होणाऱ्या पतीला चुकीची माहिती दिल्याने त्या तरुणीचा विवाह मोडला. त्यांनतर दि.१३ मे रोजी दुपारी बाराच्या सुमारास अक्षयसह त्याचा भाऊ राहुल व वडील दिलीप साठे हे त्या तरुणीच्या घरी गेले. त्यावेळी तुझे कोणासोबतही लग्न होऊ देणार नाही. तुझी बदनामी करु, अशी धमकी देऊन निघुन गेले. त्यांनतर त्या तरुणीने आईसह वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक मदनसिंग घुनावत हे करीत आहेत.