मुंबई: जनसामान्यांचा आधार अशी ख्याती असलेले आणि आपलं संपूर्ण आयुष्य सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची घालणारे नेते म्हणजे आनंद दिघे. आनंद दिघे या लोकनेत्याचा जीवनप्रवास सिनेमाच्या रूपानं प्रेक्षकांच्या आलाय. चित्रपटाला राजकीय पार्श्वभूमी असल्यानं नेतेमंडळींनीही या चित्रपटाला पसंती दर्शवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील चित्रपट पाहिलाय. असं असलं तरी चित्रपटासंदर्भात सध्या वेगळीच चर्चा रंगताना दिसतेय.
अभिमानास्पद! कान्स चित्रपट महोत्सवात ‘गोदावरी’ प्रवाह
चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं होतं. निवडणूका डोळ्यासमोर ठेवून हा चित्रपट आणला जातोय, अशी चर्चा सोशल मीडियावर झाली. असं असतानात सध्या एक पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. दिवंगत आनंद दिघे यांच्या गाडीवर १२ वर्षे चालक म्हणून काम केलेल्या पीटर डिसुझा यांच्या नावानं ही पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये धर्मवीर हा चित्रपट आनंद दिघे यांच्यासाठी नव्हे तर एकनाथ शिंदे यांचं मार्केटिंग करण्यासाठी बनवण्यात आल्याचं म्हटलं गेलंय.

Video: हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर…आनंद दिघे आणि राज ठाकरेंची अखेरची भेट
काय आहे ही पोस्ट?

धर्मवीर हा चित्रपट आनंद दिघेंचा नसून एकनाथ शिंदेंचा आहे.

आजच्या युवा वर्गानं आनंद दिघेंना पाहिलं नाही. त्यांची कारकीर्द पाहिली नाही. म्हणून एकनाथ शिंदेंनी आनंद दिघेंच्या आयुष्यावर नव्हे तर स्वत:च्या मार्केटिंगसाठी हा चित्रपट काढलाय.

ठाण्यात शिवसेना संपली आहे. युवा वर्ग हा एकच पर्याय आहे आहे आणि तो देखील आनंद दिघेंच्या नावानेच. जुने शिवसैनीक नाराज आहेत.

मी बारा वर्षे आनंद दिघेंसोबत होतो. पण एकनाथ शिंदेंना त्यांच्यासोबत पाहिलं नाही. हे सर्व निवडणूकीसाठी चाललंय.

व्हायरल पोस्ट:

व्हायरल पोस्ट

ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असली तरी पीटर डिसुझा यांनी या पोस्टबद्दल काहीही माहित नसल्याचं म्हटलंय. ‘माझ्या नावानं ही पोस्ट कोणी आणि का व्हायरल केली, हे माहिती नाही’,असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here