मुंबई: सध्या मराठी चित्रपट ‘धर्मवीर’ ची सर्वत्र प्रचंड चर्चा आहे. चित्रपट धर्मवीर आनंद दिघेंच्या आयुष्यावर आधारित आहे. अभिनेता प्रसाद ओक यानं आनंद दिघे यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. तर दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं.
Dharmaveer Trailer- ‘डोक्यावर टोपी घालून फिरणारा नाही, डोक्यात जिहाद घेऊन जगणारा मुसलमान आपला शत्रू’
प्रसाद ओक याला आनंद दिघे यांच्या रुपात पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. प्रसादचा लुक पाहून प्रत्यक्षात आनंद दिघे असल्याचा भास होत असल्याच्या प्रतिक्रिया बऱ्याच जणांनी दिल्या. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रसादच्या अभिनयाचं देखील तितकंच कौतुक होत आहे. पण या चित्रपटात दिघेंची भूमिका साकारण्यासाठी प्रविण तरडे यांची पहिली पसंती प्रसाद नव्हता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तरडे यांनी याबद्दल खुलासा केलाय.


काय म्हणाले प्रविण तरडे?
धर्मवीर चित्रपट भव्य असावा, असाच विचार होता. इतक्या मोठ्या व्यक्तीचा जीवनप्रवास दाखवायचा त्यामुळं कुठंही चुकायचं नव्हतं. कास्टिंवरही खूप काम केलं. बऱ्याच जणांचे लुक टेस्ट घेतले. पण प्रसाद माझ्या डोक्यातही नव्हता. माझ्या डोक्यात तेव्हा दिग्दर्शक आणि लेखक विजू मान यांचं नाव होतं. पण आनंद दिघेंच्या रुपात जेव्हा प्रसादला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा आणखी विचार करण्याचा प्रश्नच नव्हता, असं तरडे म्हणाले.
Video: हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर…आनंद दिघे आणि राज ठाकरेंची अखेरची भेट

धर्मवीर निवडताना..प्रसाद सांगतोय त्याचा अनुभव
‘भूमिकेसाठी बऱ्याच अभिनेत्यांची लूक टेस्ट माझ्या अगोदर झाली होती. पण हवा तसा; आनंद दिघे यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसा चेहरा त्यांना सापडत नव्हता. दिगदर्शक प्रवीण तरडेंचे सहकारी विनोद वनवेंनी माझं नाव सुचवल्याचं मला नंतर समजलं आणि अचानक एक दिवशी मला मंगेशचा फोन आला. वेळ असेल तर एका लूकटेस्टसाठी ठाण्यात ये. दाढी, मिशी असा मेकअप सुरू केला, तेव्हा मला नेमका अंदाज येईना की नक्की कसली लुक टेस्ट आहे. मंगेश म्हणाला, आनंद दिघे साहेबांच्या भूमिकेसाठी लूक टेस्ट आहे. मी क्षणभर स्तब्ध झालो. थोडी आधी कल्पना तरी द्यायची अभ्यास करून आलो असतो. सगळं पटलं आणि चेहरा जुळून आला तरच आपण फायनल करणार आहोत, असे मंगेश म्हणाला. ज्येष्ठ रंगभूषाकार विद्याधर भट्टे यांनी जी काही जादूची काडीच माझ्या चेहऱ्यावर फिरवली; त्यांनी माझं रुपडे बदलून टाकलं. दिघेसाहेब हसले की त्यांच्या ओठातून दात दिसायचे, माझे दिसत नव्हते. नाकाचं गणित नीट जमत नव्हतं. त्यावर आम्ही काम केले. नंतर दुसऱ्यांदा लूक टेस्ट आणि त्या गेटअपमध्ये सीन केला. तो व्हिडिओ मंगेशनं एकनाथ शिंदेसाहेबांना पाठवला. त्यांनी लगेचच होकार दिला आणि आनंद दिघेंच्या भूमिकेसाठी माझं नाव निश्चित झालं’; असं अभिनेता प्रसाद ओकनं सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here