माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
सोनाली गायकवाड असे मयत महिलेचे नाव असून प्रसूती कळा जाणवल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु डॉक्टरांनी वेळीच लक्ष न दिल्याने अति रक्तस्राव होऊन मातेसह नवजात बालकाचा यात मृत्यू झाला आहे. नातेवाईकांनी मागणी केल्यानंतर माजलगाव पोलिस ठाण्यात ३०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याआधीही जाजू हॉस्पिटलवर आरोप…
बीड जिल्ह्यात असे अनेक प्रकार देखील आता दिवसेंदिवस अवघड होत चालले आहेत. मात्र, जाजू हॉस्पिटलवर हा पहिलाच आरोप नसून याआधी देखील अनेक आरोप झालेले माजलगावकर सांगत आहेत. मात्र, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी देखील मागणी नातेवाईकांकडून होत आहे. मात्र, पोलीस प्रशासनाने देखील त्यांना लवकरात लवकर सहकार्य केले नाही. त्यामुळे नातेवाईक देखील संतापलेले पाहायला मिळत आहे.
ठाकरे सरकार बाळासाहेबांचं तरी ऐकणार का?; मनसेनं करुन दिली बाळासाहेबांच्या मुलाखतीची आठवण