मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणं अभिनेत्री केतकी चितळे हिला चांगलंच भोवलं आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर केतकी हिला शनिवारी सायंकाळी नवी मुंबईतून अटक केली.

केतकीच्या पोस्टनंतर वाद निर्माण झाला. केतकी हिच्या पोस्टवर राजकीय नेते तसंच सिनेसृष्टीतील कलाकारांनीही तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेते आणि शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
केतकी चितळेचा लॅपटॉप, मोबाइल जप्त; शरद पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट प्रकरण
‘आपली संस्कार आणि संस्कृती विसरून विधानं करणाऱ्यांबद्दल मला काहीच बोलायचं नाही. ज्येष्ठांचा आदर केला गेलाच पाहिजे आणि हिच महाराष्ट्राची संस्कृती आहे. याविषयी मी जास्त काहीही बोलू इच्छित नाही, असं बांदेकर म्हणाले आहेत.

कोर्टात काय म्हणाली केतकी?

केतकीला रविवारी ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी केतकीनं वकील न घेता न्यायालयात स्वत:ची बाजू मांडली. इंग्रजी भाषेत युक्तिवाद करताना केतकीनं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला. मी फेसबुकवर जी पोस्ट टाकली ती एक प्रतिक्रिया होती. एक सामान्य व्यक्ती म्हणून मला लिहण्याचं आणि बोलण्याचं स्वातंत्र्य नाही का, असा सवाल केतकीनं उपस्थित केला.

मी राजकीय नेता किंवा मास लीडर नाही. त्यामुळं माझ्या लिहण्यानं कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही, असंही केतकीनं म्हटले. ही पोस्ट मी स्वत:च्या मर्जीनं फेसबुकवर टाकली होती, असं सांगत तिनं या सगळ्यामागं इतर कोणाचाही हात असल्याची शक्यताही नाकारली.

‘तू माझ्या समोर असतीस तर मी तुझं काय केलं असतं सांगता येत नाही’ अभिनेत्रीने केतकीला झापलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here