इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांनी सत्ता गमावल्यापासून देशभरातील विविध ठिकाणी सभांचं आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. इमरान खान यांच्या सभांना जोरदार प्रतिसाद मिळतं आहे. सियालकोटमधील सभेनंतर माघारी येत असताना इमरान खान यांच्या दोन्ही फोनची चोरी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पार्टीचे नेते शहबाज गिल यांनी ही माहिती दिली आहे. इमरान खान यांचे दोन्ही फोन सियालकोट विमानतळावरुन चोरी करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
6G in India: पंतप्रधान मोदींनी केली ६जी ची घोषणा, जाणून घ्या कधी होणार लाँच
डॉन न्यूजच्या बातमीनुसार शहबाज गिल यांनी इमरान खान यांच्या सभेच्या दोन दिवसानंतर दावा केला आह. गिल यांनी इमरान खान यांच्या सभेला जाणीवपूर्वक सुरक्षा देण्यात आली नसल्याचा आरोप केला. सियालकोटमधील सभेत इमरान खान यांनी माझी हत्या झाल्यास ते व्हिडिओ प्रदर्शित करा, असं म्हटलं होतं. माझ्या जीवाला धोका असून जर खून झाल्यास रेकॉर्डिंग करुन ठेवलेला व्हिडिओ दाखवा, असं इमरान खान म्हणाले होते.

इमरान खान यांचे फोन चोरी करण्याचे आदेश?
इमरान खान यांनी त्यांची हत्या झाल्यास एक व्हिडिओ जारी करण्यात यावा, असं म्हटलं होतं. शहबाज गिल यांनी कुणाचं नाव न घेता तुम्ही मुर्ख आहात, इमरान खान यांनी रेकॉर्ड केलेला व्हिडिओ फोनमध्ये मिळणार नाही, हे समजायला हवं. इमरान खान यांचे मोबाईल फोन चोरी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असा आरोप शहबाज गिल यांनी केला आहे. इमरान खान यांना मारण्याचा कट देशात आणि परदेशात शिजल्याचा दावा त्यांनी केला.
Weather Alert : पुढच्या ३-४ तासांत राज्यात वादळी पाऊस, ३ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून इशारा
इमरान खान यांनी रविवारी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांच्यावर टीका केली. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिकंन यांना बिलावल भुट्टो भेटतील आणि पुढच्या आठवड्यात पैशांची भीक मागतील, असा आरोप केला. बिलावल भुट्टो अँटनी ब्लिंकंन यांच्यासमोर बोलू शकत नाहीत. बिलावल आणि त्यांच्या वडिलांचे पैसे जगभरात कुठे कुठे आहेत हे ब्लिंकनं यांना माहिती असल्याचा आरोप इमरान खान यांनी केला.

ठाकरे सरकार बाळासाहेबांचं तरी ऐकणार का?; मनसेनं करुन दिली बाळासाहेबांच्या मुलाखतीची आठवण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here