परभणी : सामाईक ट्यूबवेल शेतीला पाणी घेण्याच्या कारणावरून सख्या पुतण्याने आपल्या काकाच्या डोक्यात दांड्याने मारहाण केल्याची घटना १४ मे रोजी तालुक्यातील फुलारवाडी येथे घडली. दरम्यान, याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारोती पवार, महादू पवार, सुरेश पवार, कान्हा पवार असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी विठ्ठल पवार यांच्या फिर्यादीवरून भाऊ मारोती पवार, पुतण्या सुरेश पवार, महादू पवार, कान्हा पवार यांच्याविरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पाथरी पोलीस करीत आहेत.