नवी दिल्ली : भाजपनं (
) गेल्या सहा वर्षात चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री बदलले. त्यापैकी गुजरात आणि उत्तराखंड राज्यातील निवडणुकीत भाजपनं विजय मिळवला. इतर चार राज्यांच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. दुसरीकडे भाजपनं गेल्या पाच वर्षात सहा राज्यांमधील मुख्यमंत्री बदलले नाहीत. यामुळं भाजपला त्या ठिकाणी पुन्हा सत्ता मिळवता आली नाही. त्रिपुराचे मुख्यमंत्री बदलण्यामागं हे देखील एक कारण असल्याचं बोललं जात आहे.

राजस्थान, मध्यप्रदेश, झारखंड, छत्तीसगड, हरियाणा आणि महाराष्ट्रात भाजपला पूर्ण बहुमत मिळालं नाही. याला अपवाद म्हणजे हरियाणात भाजपनं आघाडी करुन सत्ता मिळवली. तर, मध्यप्रदेश काँग्रेस फुटल्यानं भाजप पुन्हा सत्तेत आली.

राजस्थानमध्ये २०१७ मध्ये भाजपनं तत्कालीन मुख्यमंत्री वसुंधरराजे यांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढवली. काँग्रेसनं भाजपचा पराभव केला आणि अशोक गेहलोत मुख्यमंत्री झाले. २०१७ मध्ये छत्तीसगडमध्ये रमण सिंग यांच्या चेहऱ्यावर भाजपनं निवडणूक लढवली. तिथं देखील भाजपचा पराभव झाला आणि काँग्रेस सत्तेत आलीय

मध्यप्रदेशमध्ये २००५ ते २०१७ या काळात मुख्यमंत्री असलेल्या शिवराज सिंह चौहान यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली. मध्य प्रदेशचा निकाल त्रिशंकू लागला. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. काँग्रेस आणि बसपानं सरकार स्थापन केलं आणि कमलनाथ यांना मुख्यमंत्री केलं. नंतरच्या काळात काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधीया यांचा गट पक्षातून बाहेर पडला आणि भाजप पुन्हा सत्तेत आली.

महाराष्ट्रात २०१९ मध्ये भाजपनं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढवली. भाजपनं २०१४ च्या निवडणुकीत १२२ जागांवर विजय मिळवला होता. तर, २०१९ च्या निवडणुकीत भाजपनं १०५ जागांवर विजय मिळवला. मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद झाले. शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्ता स्थापन केली.

हरियाणात भाजपनं मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्त्वात २०१९ मध्ये निवडणूक लढवली. मनोहरलाल खट्टर बहुमत मिळवण्यात अपयशी ठरले. त्यांना निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर दुष्यंत चौटाला यांच्या जेजेपी सोबत आघाडी सरकार स्थापन करावं लागलं.

झारखंडच्या निवडणुका २०१९ मध्ये झाल्या भाजपनं तिथं मुख्यमंत्री रघुबर दास यांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढवली. झारखंडमध्येही त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. झारखंड मुक्ती मोर्चा सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजप दुसऱ्या स्थानी राहिला. झामुमो आणि काँग्रेसनं सत्ता स्थापन केली. हेमंत सोरेन मुख्यमंत्री झाले.

भाजपनं मुख्यमंत्री बदलला आणि सत्ता आली
भाजपनं २०१७ मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी आनंदीबेन पटेल यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवलं आणि विजय रुपाणी यांना संधी दिली. विजय रुपाणी यांच्या नेतृत्त्वात भाजपनं विजय संपादन केला. आता, पुन्हा एकदा गुजरातमध्ये भाजपनं मुख्यमंत्री बदलले आहेत. भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री करण्यात आलं आहे.

उत्तराखंडमध्ये भाजपनं निवडणुकीपूर्वी पुष्करसिंह धामी यांना मुख्यमंत्री केलं. भाजपनं पहिल्यांदा त्रिवेंद्रसिंह रावत यांची उचलबांगडी केली. त्यानंतर तिरथ सिंह रावत यांनासंधी दिली. जुलै २०२१ मध्ये तांत्रिक कारणामुळं पुष्करसिंह धामी यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. भाजपनं उत्तराखंडमध्ये ही निवडणूक जिंकली.

कर्नाटकमध्ये भाजपनं बी.ए. येडियुरप्पा यांना पदावरुन हटवून बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री केलं आहे. आता त्रिपुरामध्येही बिप्लब देव यांना हटवून माणिक साहा यांना मुख्यमंत्री केलं आहे. दोन्ही राज्यात २०२३ मध्ये निवडणूक होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here