मुंबई: ‘ख्वाडा’ या आपल्या पहिल्याच चित्रपटातून लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांचा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘हैद्राबाद कस्टडी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट गुन्हेगार आणि पोलीस यांच्यावर आधारित आहे.

‘ही आपली संस्कृती नाही..’ आदेश बांदेकर केतकी चितळेवर संतापले
२०१८मध्ये या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं होतं. हा चित्रपट पोलिस कोठडी आणि कैदी या विषयावर आधारित असल्याचं बोललं जातंय. हा विषय तो कसा मांडतोय हे आता पाहण्यासारखं असेल. त्यामुळं या चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या दोन एक वर्षापासून या चित्रपटाची चर्चा सुरू होती. परंतु करोनामुळं हा चित्रपट रखडला होता. अखेर या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली आहे. भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी युट्यूवर या चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर केलाय.

‘हैद्राबाद कस्टडी या चित्रपटाची स्टारकास्ट सगळी नवीन असून एक वेगळा विषय या चित्रपटाद्वारे हाताळण्यात येत आहे, असं कऱ्हाडे सांगतात. या चित्रपटाला ओमकार स्वरूप, रोहित नागभिरे संगीत देणार आहेत.

हैद्राबाद कस्टडीचं शूटिंग सुरू असतानाच करोनामुळं लॉकडाऊन लागला. करोनाच्या दोन वर्षात शूटिंग करता आलं नाही. त्यामुळं अनेकांचे फोन आणि मेसेज आले. ‘हैद्राबाद कस्टडी’ कधी येणार? शूटिंग संपलं की नाही, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देणारा हा व्हिडिओ कऱ्हाडे यांनी शेअर केलाय. त्यामुळं प्रेक्षकांची उत्सुकता आणखी तानली गेली आहे.

पाहा व्हिडिओ:

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here