यवतमाळ : शेतीच्या हिस्से वाटणीवरून झालेल्या वादात लहान भावाने मोठ्या भावाची धारदार चाकूने वार करीत हत्या केली. ही खळबळजनक घटना मंगळवार १७ मे रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास शहरातील माळीपूरा परिसरात घडली. राहुल मनोहर बाचलकर (३८) रा. माळीपूरा चमेडिया नगर, यवतमाळ असे मृतकाचे नाव असून मारेकरी सतिष मनोहर बाचलकर (२३) याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शेती वाटणीवरून झाला वाद…

शहरातील माळीपूरा चमेडिया नगर येथे राहुल बाचलकर कुटूंबीयांसह राहत होता. सन २०१४ मध्ये त्याचा विवाह झाला असून त्याला दोन मुले आहे. राहुल आणि त्याचा लहान भाऊ सतिष दोघेही शहरातील टांगा चौक परिसरात फुलाचा व्यवसाय करीत होते. लग्नानंतर आठ महिने राहुल कुटूंबीयांसोबत एकत्र राहीला, त्यानंतर शेजारी भाड्याने राहायला गेला होता. सन २०२० मध्ये सतिष याचा विवाह झाल्यानंतर फुलाच्या दुकानाच्या व्यवहारावरून दोघात वाद होत होते. त्यामूळे राहुल याने त्याच परिसरात स्वत:चे वेगळे फुलाचे दुकान सुरू केले. फुलाच्या दुकानातून मिळालेल्या नफ्यावर यन २०१७-१८ मध्ये राहुल आणि सतिष दोघांच्या नावावर मादणी बोरगाव येथे चार एकर शेत घेण्यात आले. तेव्हापासून राहुल ते शेत एकटाच वाहन होता. तिन ते चार महिन्यापूर्वी सतिष याने दोन एकर शेती वाहायला मागितली होती, त्यावेळी राहुलने होकार देखील दिला होता.

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा न बदलणं महागात, भाजपनं ५ वर्षांत ५ राज्यांतली सत्ता गमावली
चाकून केले सपासप वार…

अशातच १६ मे रोजी राहुल बाचलकर, त्याचा मामा विजय कांबळे, जावाई धिरज राऊत, मावस भाऊ बादल नागरीकर आदी सतिष याने मागितलेल्या दोन एकर शेतीच्या वाटणीकरीता मादणी बोरगाव येथे गेले होते. यावेळी सतिष बाचलकर देखील उपस्थित होता. त्यानंतर सायंकाळी राहुल घरी परत आला. यावेळी त्याने पत्नीला सतिष याने शेतीच्या हिस्स्याबाबत शिविगाळ केल्याचे सांगितले. दरम्यान, दुसऱ्या दिवशी मंगळवार १७ मे रोजी सकाळी ८.३० ते ९ वाजताच्या सुमारास राहुल आईच्या घरी गेला आणि त्याने स्वत:च्या काही वस्तुंची मागणी केली. त्यामूळे राहुल आणि त्याच्या आईत वाद झाला. यावेळी अचानक सतिष हातात धारदार चाकू घेवून आला. दरम्यान, त्याने राहुलच्या पाठीवर चाकूने वार करत त्याचा खाली पाडले. त्यानंतर अंगावर बसून सपासप वार केले.

IPL 2022, MI vs SRH Live Score : मुंबई आणि हैदराबादच्या सामन्याचे लाइव्ह अपडेट्स
अतिरक्तस्त्राव झाल्याने राहुलचा मृत्यू …

घटनेची माहिती मिळताच पत्नी रिता बाचलकर हीने धाव घेत आरडाआरेड केली. तसेच परिसरातील रिक्षात राहुल याला घेवून जिल्हा शासकीय रूग्णालय गाठले. मात्र, अतिरक्तस्त्राव झाल्याने राहुल याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मारेकरी सतिष बाचलकर याला ताब्यात घेतले. ही कारवाई ठाणेदार नंदकुमार पंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक जनार्दन खंडेराव, पथकातील अजय डोळे, प्रदीप नाईकवाडे, सुरज साबळे, मिलिंद दरेकर, निलेश घोसे यांनी पार पाडली. या प्रकरणी शहर पोलिसांनी रिता बाचलकर हीने दिलेल्या तक्रारीवरून विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले आहे.

Best Recharge Plans: जिओचे टेन्शन वाढणार ! ४९९ रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देतेय ९० दिवसांपर्यंत अनलिमिटेड डेटा आणि कॉल्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here