अंकारा : रशियानं यूक्रेनविरुद्ध नाटोतील सहभागाच्या मुद्यावरुन युद्ध सुरु केलं आहे. फिनलँड आणि स्वीडन नाटोमध्ये सहभागी होण्याची तयारी करत आहे. तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तईप एर्दोगन यांनी फिनलँड आणि स्वीडनच्या समावेशाला कडाडून विरोध केला आहे. बीबीसीच्या रिपोर्टनुसार एर्दोगन यांनी स्वीडन हा दहशतवाद्यांचा घर असल्याचा आरोप केला आहे.

एर्दोगन यांनी स्वीडन आणि फिनलँड यांनी दहशतवादी संघटनांना विरोध केलेला नाही. आपण त्या देशांवर विश्वास कसा ठेवायचा असा सवाल त्यांनी केला. या दोन्ही देशांनी कुर्दिस्तान वर्कर्स पार्टीच्या सदस्यांना आश्रय दिल्याचा आरोप एर्दोगन यांनी केला आहे. तुर्की त्या पार्टीला दहशतवादी संघटना समजते.
राज्यसभा निवडणूक : महाराष्ट्रातील सर्वपक्षीय आमदारांना संभाजीराजे छत्रपतींचं खुलं पत्र

हेलसिंकीमध्ये संसदेत बोलताना फिनलँडचे पराराष्ट्र मंत्री पेक्का हाविस्टो यांनी तुर्कीच्या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त केलं आहे. आम्हाला एर्दोगन यांच्या भूमिकेवर काही बोलायचं नसल्याचं ते म्हणाले.

फिनलँडनं गेल्या आठवड्यात नाटोमध्ये सहभागी होण्याची इच्छा जाहीर केली आहे. स्वीडननं १४ मे रोजी नाटोमध्ये सहभागी होण्याची इच्छा जाहीर केली आहे. स्वीडनच्या पंतप्रधान पंतप्रधान मैग्डेलेना अँडरसन यांनी सोमवारी यासंदर्भात एक वक्तव्य केलं. नाटोमुळं स्वीडनला मजबुती प्राप्त होईल. दरम्यान, अँडरसन यांनी आमच्या भूमीवर अणवस्त्र ठेवणार नसल्याचं म्हटलं आहे.

नॉर्वे, डेन्मार्क, आयलँड या नाटोच्या सदस्य देशांकडून स्वीडन आणि फिनलँडच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. ब्रिटननं स्वीडन आणि फिनलँडच्या नाटोतील सहभागाला पाठिंबा दिला आहे. स्वीडनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मंगळवारी नाटोतील सहभागाच्या अर्जावर स्वाक्षरी केली आहे. रशियानं देखील फिनलँड आणि स्वीडनच्या नाटोतील समावेशाची आम्हाला अडचण नसल्याचं म्हटलं आहे. मात्र, दोन्ही देशांना परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देखील दिला आहे.
पराभवाच्या रागात भारताच्या कुस्तीपटूने पंचांनाच मारहाण करत केला राडा, व्हिडिओ झाला व्हायरल
दरम्यान, रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध सुरु होऊन तीन महिने पूर्ण होत आले आहेत. रशियाला यूक्रेन विरुद्धच्या युद्धाता अपक्षेप्रमाणं यश मिळालेलं नाही. कीव्हमधून रशियाला माघार घ्यावी लागलीय. तर, मारियुपोलवर रशियानं कब्जा मिळवला आहे. नाटोच्या मुद्यावरुन रशिया आणि यूक्रेनचं युद्ध सुरु झालं होतं. त्याच नाटोमध्ये फिनलँड आणि स्वीडनच्या समावेशाची चर्चा सुरु आहे.

श्रीलंका संकटात: पंतप्रधानांनीच सांगितलं, फक्त एक दिवसाचे पेट्रोल शिल्लक!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here