मुंबई : आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी (Mumbai) महत्त्वाची बातमी आहे. मुंबई महापालिकेनं (BMC) यासंदर्भात माहिती दिली आहे. केंद्र सरकारनं करोना प्रतिबंधक लसीकरणामधील (Corona Vaccine) दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमधील अंतर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय मुंबईत देखील लागू करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिली आहे. मुंबई महापालिकेनं यासंदर्भातील माहिती दिल्यानं परदेशी जाणाऱ्या मुंबईकरांना याचा फायदा होणार आहे. केंद्र सरकारनं यापूर्वी करोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेऊन ९ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असल्याचं बुस्टर डोस घेण्याचं आवाहन केलं होतं.

केंद्र सरकारानं आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी करोना लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमधील अंतर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमधील अंतर ९ महिन्यांवरुन ९० दिवसांवर आणण्यात आलं आहे. कोविन अ‌ॅपमध्येही त्यासंदर्भात बदल करण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील खासगी आणि सरकारी लसीकरण केंद्रांना यासंदर्भातील आदेश देण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिली आहे.

केवळ आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी निर्णय
मुंबई महापालिकेनं करोना लसीच्या बुस्टर डोसमधील अंतर कमी करण्याचा निर्णय केवळ आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी असल्याचं सांगितलं आहे. सामान्य नागरिकांसाठी हा निर्णय लागू नसल्याचं कळवण्यात आलं आहे.
राज्यसभा निवडणूक : महाराष्ट्रातील सर्वपक्षीय आमदारांना संभाजीराजे छत्रपतींचं खुलं पत्र
केंद्र सरकारनं गेल्या काही दिवसांपूर्वी करोना लसीचा दुसरा डोस आणि बुस्टर डोस याच्यातील कालावधी कमी करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयालनं त्यासंदर्भात घोषणा केली होती. ती घोषणा केवळ परदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी करण्यात आली होती. NTAGI नं यासंदर्भात शिफारस केली होती. यानंतर ९ महिन्यानंतर ती मुदत ९० दिवसांपर्यंत कमी करण्यात आली होती.

स्मृती इराणींविरोधात आंदोलन; राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांच्यासह ४० जणांवर गुन्हा दाखल
देशात अनेक राज्यांमध्ये करोना संसर्ग वाढत असल्यानं खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नवी दिल्लीत गेल्या २४ तासात ३९३ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर, दोन करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत १५८ करोना रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबई महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाचा महापौर?; सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here