यूट्यूबवर शेअर करण्यात येत असलेला व्हिडिओ डिलीट करावा, असंही कुणाला वाटलं नाही. माझ्यामुळं ज्यांचं मन दुखावलं असेल त्यांची माफी मागतो. माझ्याबाजूनं ज्यांनी भूमिका घेतली त्यांचे आभार मानतो आणि मृत्यूपूर्वी त्यांच्या उपकारांची परतफेड करेन, असं ते म्हणाले.
आमिर लियाकत यांनी आता मी पाकिस्तान सोडत आहे, कारण ही भूमी आता वास्तव्य करण्यासारखी राहिली नसल्याचं म्हटलं. मला ठेच पोहोचली आहे, माझ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं. माझ्यावर मीम्स बनवण्यात आले, यामुळं मी दुखावलो गेलो आहे, मात्र मी हसून या गोष्टी टाळत राहिलो, असं लियाकत म्हणाले.
मी दानियाला माफ केलं आहे. जर ती अल्लाकडे माफी मागणार असेल तर तिच्यासाठी माझ्या घराचे दरवाजे खुले आहेत. मात्र, तिनं जे केलं ते योग्य नव्हतं असं आमिर लियाकत म्हणाले.
मी कुठं जाणार आहे, हे कुणाला सांगणार नाही. मात्र, मी परत येणार नाही. मी एक था टायगरमधील सलमान खान सारखं क्यूबाला निघून जाईन, असं आमिर लियाकत म्हणाले. आमिर लियाकत यांच्या या व्हिडिओवर देखील सोशल मिडियात फिरकी घेण्यात आली आहे. काही जणांनी या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे.
आमिर लियाकत यांची तिसरी पत्नी दानिया शाह हिनं गंभीर आरोप करत घटस्फोटाची मागणी केली आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये दोघांनी लग्न केलं होतं. आमिर लियाकत मारहाण करत असे, ड्रग्ज घ्यायला लावणे आणि न्यूज व्हिडिओ शुटींग करायला लावत असे, असे आरोप दानिया हिनं केले होते. यानंतर आमिर लियाकतचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ते व्हिडिओ दानिया शाह हिनं व्हायरल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत आमिर लियाकत विवस्त्र असून बेडवर ड्रग्ज देखील आढळलं होतं. एका सोशल मीडिया यूजरनं तुम्ही जे पेरलं ते उगवलं असल्याचा आरोप करत पहिल्या पत्नी आणि मुलांबरोबरच्या वागणुकीची आठवण करुन दिली. तर, एका सोशल मीडिया यूजरनं पाकिस्तानातून गेल्यानंतर परत येऊ नका, असं म्हटलंय.
ठाकरे सरकार बाळासाहेबांचं तरी ऐकणार का?; मनसेनं करुन दिली बाळासाहेबांच्या मुलाखतीची आठवण