ठाणे महानगरपालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, केमिकल वाहतुकीसाठी रत्नागिरीकडे निघालेल्या टँकर मध्यरात्रीच्या सुमारास ठाण्यातील घोडबंदर रोडला पलटला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. अपघातग्रस्त टँकरमधून दोन जणांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
वर्दळीच्या रस्त्यावर टँकर पलटल्याने काही काळासाठी या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अखेर ३ तासानंतर टँकर रस्त्यातून हटवण्यात आला आणि वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. दरम्यान, अपघातानंतर टँकरमधील केमिकल संपूर्ण रस्त्यावर पसरले होते. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून रस्ता स्वच्छ करण्याचं काम सुरू होतं.
आसाममध्ये पावसानं हाहाःकार; 20 जिल्ह्यांना फटका, भूस्खलनात जीव गमावले