गृहमंत्रालयाचा २४ तास नियंत्रण कक्ष
दिल्लीत विविध मंत्र्यांचे आणि अधिकाऱ्यांचे काम आजपासून मंत्रालयातून सुरू झाले आहे. सोशल डिस्टन्सिंगची खबरदारी सर्वत्र बाळगण्यात येत आहे. गृह मंत्रालयातही अधिकारी आणि कर्मचाऱ्याकडून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात आहेत. २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर गृहमंत्रालयात २४ तास नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला. २४ मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमध्येही गृहमंत्रालयात काम सुरू आहे.
राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील कायदा-सुव्यवस्थेवर देखरेख ठेवणं. आत्यावश्यक सुविधा आणि वस्तुंचा पुरवठा सुरळीत ठेवणं. लॉकडाऊन घोषित होताच इतर राज्यांमधील हजारो मजुरांनी स्थलांतर सुरू केले होते. पण त्यांना रोखून त्यांच्यासाठी जेवणाची, राहण्याची आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत गृहमंत्रालयाकडून देखरेख ठेवली जात आहे.
गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी आणि नित्यानंद राय हेही काम करत आहेत. गृहमंत्रालयाच्या बैठकांमध्ये सहभागी होत आहेत. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी सुट्टीच्या दिवशीही काम करत आहेत.
केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला हे मंत्रालयातील सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने कामाला अंतिम स्वरूप देत आहेत. कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी बोलावलेल्या मुख्य सचिवांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्येही सहभागी झाले होते. अजय भल्ला हे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५नुसार स्थापन केलेल्या राष्ट्रीय कार्यकारी समितीचे अध्यक्ष आहेत. या कायद्यानुसारच देशात लॉकडाऊनच्या उपाययोजना लागू करण्यात येत आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times