ठाणे : भिवंडीतील मानकोली नाक्याजवळील इंडियन कार्पोरेशन कॉम्प्लेक्समधील इमारतीला सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, इमारतीला आग लागल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला. अचानक लागलेल्या आगीमुळे काही काळासाठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
दापोली पोलीस स्टेशनला आग, कागदपत्र जळाल्याची शक्यता