मुंबई: ‘आनंद दिघे आणि ठाणे शहर’ हे एक अजोड समीकरण आहे. एखाद्या राजकीय नेतृत्त्वानं समाजात, विशेषतः तळागाळात एवढं आपुलकीचं स्थान मिळवावं, हे फार दुर्मीळ आहे. दिघे यांच्या अपघाती मृत्यूला २० वर्षं लोटली, तरी ठाण्यातील त्यांच्या लोकप्रियतेत फरक पडलेला नाही. अशा व्यक्तिमत्त्वावर चित्रपट काढणं, हे मोठं आव्हान होतं. हे आव्हान या चित्रपटाच्या टीमनं पेललं. चित्रपट पाहून अनेक दिग्गजांनी कौतुक केलं आहे.
‘धर्मवीर’साठी प्रसादला नव्हे तर या दिग्दर्शकाला होती पहिली पसंती , प्रविण तरडेंचा खुलासा
मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी पोस्ट, व्हिडिओ शेअर करत प्रसाद ओक आणि या चित्रपटाच्या टीमचं कौतुक केलं आहे. अभिनेता संतोष जुवेकर यानं एक प्रसादचं कौतुक करण्यासाठी एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओ तो बोलत नाहीए , तर संतोषची आई बोलताना दिसतेय. संतोषची आई प्रसादचं कौतकु करताना दिसतेय, तर हा भावुक व्हिडिओ सध्या चर्चेत आलाय.
संतोषच्या आईनं प्रसादच्या धर्मवीर या चित्रपटाच्या पोस्टरचा एक फोटो त्यांच्या मोबाइलमध्ये काढला होता. या फोटोकडं पाहून त्या त्यांच्या भावना व्यक्त करताना दिसतायत. या भावना व्यक्त करताना त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याचं या व्हिडिओ मिळत आहे.

‘प्रसादनं इतकं सुंदर काम केलंय की, माझे डोळे भरुन आलेत. त्याला पाहून प्रत्यक्ष आनंद दिघेच आलेत की काय असं वाटलं होतं मला. मी प्रत्यक्षात आनंद दिघेंना पाहिलंय . त्यामुळं त्याला बघितल्यानंतर हुबेहुब आनंद दिघेच आलेत की काय असंच वाटलं मला.
Video: हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर…आनंद दिघे आणि राज ठाकरेंची अखेरची भेट
प्रसादला इतकं सुंदर काम मिळालं आणि त्यानंही ते केलं. त्याचं मी वादळवाटपासून सर्व भूमिका बघितल्या आहेत. या चित्रपटातही त्यानं खूप छान केलंय. संतोष तू खरंच चित्रपट पाहायला जा. मी परत एकदा सगळ्या मैत्रिणींना घेऊन जाऊन बघणार आहे, असं संतोषची आई या व्हिडिओत म्हणताना दिसतेय. तसंच या सर्व प्रवासात प्रसादची पत्नी मंजिरीनं त्याला खूप साथ दिल्याचंही त्या म्हणाल्या.

पाहा व्हिडिओ:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here