अपघात व्हिडिओ: मृत्यू बनून आली बस, एका सेंकदात झाल्याचं होत्याचं नव्हतं; VIDEO पाहून काळजाचा ठोका चुकेल – bus accident video viral on social media tamilnadu news today
चेन्नई : देशभरात अपघात होण्याचं प्रमाण वाढत आहे. अशात प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात झाला आहे. याचा एक धक्कादायक व्हिडिओदेखील समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर क्षणभर तुमचाही श्वास थांबल्याशिवाय राहणार नाही.
तामिळनाडूच्या सलेम जिल्ह्यामध्ये दोन बस एकमेकांसमोर धडकल्या. यामध्ये तब्बल ३० प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. खरंतर, या अपघाताचा एक भीषण सीसीटीव्ही व्हिडिओदेखील समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ इतका भयंकर आहे की अंगावर शहारे येतील. ही घटना १७ मे रोजी संध्याकाळी घडली असून एडप्पाडीहून तीस प्रवाशांना घेऊन निघालेल्या एका खासगी बसची तिरुचेनगोडेकडून येणाऱ्या दुसऱ्या खासगी बसला धडक बसली. हैदराबादच्या भक्ताकडून साई चरणी दोन कोटींचं सोनं, पाहा नवीन सिंहासनातले PHOTOS
तुम्ही सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहू शकता अगदी एका सेकंदात बसचा चालक त्याच्या आसनावरून कसा फेकला गेला. या धडकेत बसच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे, हेही व्हिडिओमध्ये दिसत आहे. या अपघातात एकूण ३- प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.