अहमदाबाद : गुजरातच्या मोरबी कंपनीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. कंपनीची एक भिंत कोसळल्याने तब्बल १२ मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमध्ये अनेक लोक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमध्ये मृतांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून अधिक तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिंतीच्या ढिगाऱ्याखाली तब्बल ३० मजूर अद्यापही अडकले असल्याची भीती आहे. घटनास्थळी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या हलवाड जीआयडीसीमध्ये सागर सॉल्ट कंपनीत सकाळच्या सुमारास ही घटना घडली. यामधून आतापर्यंत ९ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.

मृत्यू बनून आली बस, एका सेंकदात झाल्याचं होत्याचं नव्हतं; VIDEO पाहून काळजाचा ठोका चुकेल
स्थानिक आमदार ब्रजेश मेरजा यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना १२ मजुरांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम वेगाने सुरू आहे. इतकंच नाहीतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या घटनेवर दुख व्यक्त केलं आहे.

मोदींनी त्यांच्या ट्विटर अकांऊटवरून यासंबंधी माहिती दिली आहे. ट्विटमध्ये त्यांनी लिहलं की, ‘मोरबीतील भिंत कोसळल्याची घटना हृदयद्रावक आहे. या दु:खाच्या प्रसंगी मी शोकाकुल कुटुंबियांसोबत आहे. जखमी लोक लवकर बरे होतील अशी आशा आहे, स्थानिक अधिकारी पीडितांना शक्य ती सर्व मदत करत आहेत’
मुंबईच्या उंबरठ्यावर करोनाचं संकट, ठाण्यात नव्या रुग्णांची संख्या वाचलीत का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here