सिंधुदुर्ग: ऐन आंब्याच्या हंगामात आलेल्या करोना संकटामुळे आंबा बागायतदार व व्यापाऱ्यांची पुरती कोंडी झाली असली तरी ही कोंडी आता फुटणार आहे. करणाऱ्या गाड्यांची अडवणूक न करण्याचे स्पष्ट निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.

देवगड येथील तहसील कार्यालयात आज झालेल्या आढावा बैठकीदरम्यान कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी याबाबत माहिती दिली. आमदार नाईक म्हणाले, ‘वाशी मार्केट बंद असल्याने हापूससाठी थेट मुंबई मार्केट उपलब्ध करून द्यावे यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. खासदार विनायक राऊत आणि पालकमंत्री उदय सामंत यांचेही लक्ष या कामी वेधले आहे. कोणत्याही परिस्थितीत आंबा व्यापाऱ्यांची गैरसोय दूर करण्यात येणार आहे.’

नाईक यांच्यासमवेत सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत होते. नाईक यांच्या संपर्क दौऱ्यात त्यांनी आज देवगड एसटी डेपोलाही भेट दिली. तेथील कर्मचाऱ्यांनी आपले वेतन गेल्या महिन्यापासून झाले नसल्याची कैफियत नाईक त्यांच्यासमोर मांडली. त्यावर नाईक त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संपर्क साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावला. मंत्र्यांच्या आदेशानंतर लगेचच एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here