मुंबई: टीव्हीविश्वात ‘
देवमाणूस‘ या मालिकेचा बोलबाला पाहायला मिळतो. या मालिकेनं पहिल्या पर्वापासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. आता मालिकेच्या दुसऱ्या पर्वालादेखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभतोय. इन्स्पेक्टर
मार्तंड जामकर यांच्या एंट्रीनंतर मालिकेत रंजक वळण आले आहे. पण ‘देवमाणूस’ या मालिकेवर सध्या प्रचंड टीका होतेय. मालिकेत आलेलं वळण प्रेक्षकांना पटलं नाही.
मार्तंड जामकर नावाच्या पोलिस अधिकाऱ्याच्या एंट्रीमुळं मालिकेला नवीन ट्विस्ट मिळाला आहे. ही भूमिका अभिनेता मिलिंद शिंदे अगदी चोख बजावत आहेत. मार्तंड हे अजितकुमारला कसा धडा शिकवणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. पण अजित कुमार देव उर्फ देवी सिंग उर्फ नटवरनं हत्येचा पाढा सुरुच ठेवला आहे. एका नंतर एक खून असंच दुसऱ्या पर्वातही सुरू आहे. गावातल्या महिलांना फसवून त्यांचा खून करायचा, हेच आतापर्यंत दाखवण्यात आलं होतं. परंतु आता त्यानं मालिकेत एका चिमुकलीची हत्या केल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळं प्रेक्षकांनी संताप व्यक्त केलाय.
देवमाणूस मालिकेतील कलाकारांचीही प्रचंड चर्चा सुरू असते. काही दिवसांपूर्वी मालिकेत चिनू नावाच्या एका लहान मुलीचं एंन्ट्री झाली होती. मालिकेतील चिनू प्रेक्षकांना देखील आवडली होती. परंतु तिचा मृत्यू दाखवल्यानं प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली आहे.
प्रौढ वर्गासोबतच लहानमुलंही ही मालिका आवडीनं पाहातात. त्यामुळं बाल शोषण, बाल आघात दाखल्यानं लहानमुलांच्या मनावर परिणाम होऊ शकतो, असं प्रेक्षकांनी म्हटलं आहे.
अभिनेते मिलिंद शिंदेना व्हायचं होतं आयपीएस अधिकारी
Like this:
Like Loading...