हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ५ दिवस अंदमान आणि केरळमधील नजिकच्या शहरांमध्ये मुसळधार पाऊस होईल. केरळसह दक्षिण भारतातील काही राज्यांना पावसाने झोडपून काढलेलं असताना महाराष्ट्रातीलही नऊ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच मोसमी पावसाची प्रगती वेगाने होत असल्याने हा पाऊस अंदमान आणि निकोबार बेटांवर धडकून आता पुढे बंगालच्या दिशेने सरकला आहे.
हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दक्षिणेकडील द्वीपकल्प आणि केतल्सच्या किनार्यावर, अरबी समुद्र आणि बेटांच्या क्षेत्रांवर ढगाळ वातावरण आहे. इतकंच नाहीतर मराठवाड्यातील विदर्भाच्या काही भागांतही ढगांचे वातावरण आहे. राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
देशातील कोणत्या राज्यांना पावसाचा तडाखा?
अनेक राज्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली असून केरळसह मेघालय, आसाम आणि पश्चिम बंगालमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे. दुसरीकडे, उत्तर भारतात मात्र उष्णतेची लाट कायम असल्याचं चित्र आहे.