मुंबई : सध्या कंगना रणौत आणि सलमान खान यांच्या वाढत्या मैत्रीची चर्चा बाॅलिवूडमध्ये आहे. सलमान खानची बहीण अर्पितानं ईद पार्टी आयोजित केली होती. त्या पार्टीत कंगना पोहोचली तेव्हा अनेक स्टार्सच्या भुवया उंचावल्या. कारण कंगनानं आतापर्यंत अनेकांशी पंगा घेतला आहे. मग सलमान आणि कंगना यांची अचानक मैत्री कशी वाढली, ही पण चर्चा सुरू झाली. ईद होऊन आता १५ दिवस लोटलेत. कंगनानं स्वत:च त्यामागचं कारण सांगितलं.

प्रियांका चोप्राच्या चेहऱ्यावर जखमा पाहून चाहते पडले चिंतेत, अभिनेत्रीला नक्की झालं

टीव्ही,रोडिओ होस्ट सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत कंगना रणौतला हा प्रश्न विचारला. तू सलमानच्या पार्टीत कशी गेलीस? त्यावर कंगना म्हणाली, ‘मला बाॅलिवूड पार्ट्या अजिबातच पसंत नाहीत. पण सलमान माझा चांगला मित्र आहे. म्हणून मी त्या पार्टीत गेले.’

सलमान खाननं फोन करून बोलावलं

सलमान कंगना

या मुलाखतीत कंगना म्हणाली की तिला दस्तुरखुद्द सलमान खानचा फोन आला होता. त्यानं ईद पार्टीचं आमंत्रण दिलं. कंगना म्हणाली, सलमान खान माझा खूप चांगला मित्र आहे. त्यानं फोन केला आणि मी त्याचा मान राखला. मी पार्टीला गेले. इतकी साधी सरळ गोष्ट आहे. त्यामागे काहीच कारण नाही.

राखी सावंतला प्रेमात पाडणारा Adil Khan आहे तरी कोण?

सलमान खाननं कंगना रणौतला दिल्या शुभेच्छा

काही दिवसांपूर्वी सलमान खाननं कंगना रणौतच्या धाकड सिनेमाला शुभेच्छा दिल्या. त्यानं धाकड ट्रेलर शेअरही केला आणि कंगना रणौतच्या पूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. कंगनानंही सोशल मीडियावर सलमानला प्रतिक्रिया दिली.

कंगनानं सलमान खानला म्हटलं गोल्डन हार्ट

कंगनाची पोस्ट

सलमानच्या पोस्टवर कंगना रणौतनं प्रतिक्रिया दिली. तिनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आणि लिहिलं, धन्यवाद माझ्या दबंग हिरो, हार्ट ऑफ गोल्ड. मी आता इंडस्ट्रीत एकटी आहे, असं कधीच म्हणणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here