पुणे : मोरगाव रस्त्यावरील कऱ्हावागजकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका मोटरसायकलने जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
मोहन लष्कर असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. लष्कर हे बारामती-मोरगाव रस्ता ओलांडत असताना कऱ्हावागजकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटर सायकलने त्यांना जबर धडक दिली. धडक दिल्यानंतर ते जवळपास ५० फुटापर्यंत वर हवेत उडाले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. दुचाकी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील चौकशी पोलीस करत आहेत.