पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात २१ मे रोजी होणारी सभा रद्द करण्यात आली आहे. हवामान बदल आणि पावसाची शक्यता असल्यामुळे ही सभा रद्द केल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. ही सभा पुढच्या आठवड्यात होणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

मंगळवार १७ पासून राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर होते. या अगोदर मुंबई, औरंगाबाद येथे भोंग्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली होती. अयोध्या दौऱ्या च्या अगोदर राज ठाकरे हे पुण्यात सभा घेणार होते. त्यासाठी जय्यत तयारी देखील करण्यात आली होती. मात्र ,पावसाच्या शक्यतेने ही सभा सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे अयोध्या दौऱ्या अगोदर राज ठाकरे यांची सभा होणार का ? याची चर्चा आता रंगू लागली आहे.

डॉ. लहानेंचं १ लाखावं ऑपरेशन बघायला मुख्यमंत्री विलासराव ऑपरेशन थिएटरमध्ये गेले होते!
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेण्याच्या उद्देशाने मंगळवारी रात्री पुण्यात दाखल झालेल्या राज ठाकरे यांनी बाजीराव रोडवरील अक्षरधारा बुक गॅलरीला भेट दिली होती. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) हे त्यांचा सतत पाठलाग करणाऱ्या प्रसारमाध्यमांवर चांगलेच संतापले होते. प्रसारमाध्यम प्रतिनिधींना पाहून त्यांनी ‘काही जगू द्याल की नाही?’ असं म्हणत त्यांना कॅमेरे बंद करायला लावले.

IPL 2022, KKR vs LSG Live Score : लखनौ आणि केकेआरच्या सामन्याचे लाइव्ह अपडेट्स
राज ठाकरे यांनी मंगळवारी रात्री बाजीराव रोडवरील अक्षरधारा बुक गॅलरीला भेट दिली होती. राज ठाकरे यांनी अक्षरधारा बुक गॅलरीत निवांतपणे बसून पुस्तकं चाळली. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास राज ठाकरे अक्षरधारा बुक गॅलरीत दाखल झाले होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी तब्बल दीड तास पुस्तकांच्या सानिध्यात घालवला.

Apple चे मोठे अपडेट ! iPhone यूजर्सना मिळणार अनेक नवीन फीचर्स, जे वाढवतील फोन वापरण्याचा एक्स्पीरियंस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here